28 April, 2015

Solar Pump (सौर पंप )

Solar Pump  (सौर पंप )

SOLAR PUMP (Prof. S. V. Ghaisas, Dr. Abhijit Date, Mr. Onkar Shinde, Mr. Gole Akshay Chandrakant)

सौर पंप अर्थात सूर्याच्या उर्जेवर चालणारा पंप. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (पूर्वीचे पुणे विद्यापीठ ) उर्जा आभास प्रणाली आणि ऑस्ट्रेलिया स्थित  RMIT विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त प्रयत्नातून या सौर पंपाची रचना करण्यात आली आहे. या संशोधनावर आधारित एक लेख दैनिक लोकमत मध्ये ८ एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. 



वाढत्या लोकसंखेच्या  आजच्या ज्या अनेक गरजा आहेत त्या पैकी एक गरज म्हणजे वीज. लोकसंख्येला पुरेशी पडेल एव्हडी वीज आपण उत्पादित करू शकत नाही. त्याच मुळे  ग्रामीण भाग बरोबरच आज शहरी भागातही  वीज पुरवठा अनेकदा खाडीत होतो. आजची आपली जीवन शैलीच अशी आहे, कि आपली असंख्य कामे या विजेवर अवलंबून असतात आणि वीजच नसेल तर हि सारी कामे ठप्पच होतात. 

                   अश्या कामांपैकी एक काम म्हणजे पाणी खेचून वर चढवणे. वीज पंपाद्वारेच हे काम केले जाते. ग्रामीण भागात शेतीला पाणी देण्या साठी तर शहरी भागात इमारतींवर पाणी चढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात हे पंप वापरले जातात  वीज नसेल तर हे काम थांबतेच. डीझेल इंजिन चे पंप आहेत पण ते शहरी भागात वापरणे शक्य नाहीत आणि ग्रामीण भागातही त्याला वापरण्यास मर्यादा आहेत. डीझेल महाग असल्यामुळे त्याचा खर्च ग्रामीण भागात परवडण्यासारखा नाही.  त्यामुळे वीज नसेल तर शांत बसण्यावाचून दुसरा पर्यायच शिल्लक राहत नाही. 

प्रार्थमिक प्रस्ताव 

प्रस्ताव तयार झाल्यावर डॉ. दाते यांच्या सांगण्यावरून आर . एम . आय . टी . विद्यापीठाकडे पाठवण्यात आला. त्यांच्या कडे जगभरातील विद्यापीठाकडून असे नाविन्यपूर्ण प्रस्ताव येत असतात. आलेल्या प्रस्तावांपैकी  केवळ ५ % प्रस्ताव मंजूर केले जातात. नैसर्गिक उर्जेवर चालणाऱ्या या पंपाचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला . त्या नंतर पंपाचे काम सुरु झाले. सुरुवातीला पंपाचे डिझाईन तयार करण्यात आले. पंप अगदी बोजड होणार नाही अगदी सहज बसवता येईल याची काळजी घेण्यात आली. त्याच बरोबर कमी खर्चात तो तयार करता येईल या कडेही लक्ष देण्यात आले. 

पंपाचे स्वरूप 

साधारण १० इंच उंचीचा व २ इंच व्यास असलेला हा पंप तयार झाला. त्याची बॉडी स्टील ची आहे. हा पंप जमिनीवरच ठेवावा लागतो. कारण त्याला सौर उर्जा द्यावी लागते. एरव्ही पंपात असते त्या प्रमाणे त्यातही, पिस्टन, दट्ट्या अशी रचना आहे. फक्त त्या पंपात सर्व क्रिया विजेने होतात. तर यात त्या उष्णतेने रसायन उकळत उकळत असल्याने होतात. रसायनाला उष्णता देण्याची प्रक्रिया सौर जल तापी च्या माध्यमातून दिली जाते ( वास्तविक वर्तमान पत्रातील मूळ लेखात सोलर पैनल  असा उल्लेख झाला आहे, मात्र  पंपाची रचना करताना त्यात सौर जल तापीचा (solar water heater) चा वापर करण्यात आला आहे ).  


सौर जल तापी

(Solar Water Heater)

ज्या सौर जल तापी मधून सौर उर्जा घ्यायची ती पंपा पासून जवळच बसवता येते. तेही फारसे बोजड नाही त्यावर सतत ऊन असेल याची काळजी मात्र घ्यावी लागते. या सौर जल तापी मध्ये निर्माण होणा ऱ्या  उष्णतेच्या वहनासाठी  त्यास पाईप  जोडलेले आहेत . अत्यंत कमी जागेत हे सर्व युनिट बसू शकते. वायरिंग वगैरे  काहीच नसल्यामुळे शॉक  बसण्याची, अपघात होण्याची अशी एरवीच्या वीज पंपाला असलेली भीती या पंपाला नाही. 


असा चालतो पंप 

पाणी खेचणाऱ्या पंपाच्या तळाशी असलेल्या रसायनाला खालून उष्णता मिळाली कि ते उ कळते. त्या वर असलेला पिस्टन  त्यामुळे वर ढकलला जातो . पिस्टन वरचे पाणी त्यामुळे पंपाच्या एका डिलिव्हरी लाईन ने बाहेर फेकले जाते. बाहेर च्या थंड   
वातावरणाने वर गेलेला पिस्टन पुन्हा खाली येतो. पंपातील  त्या मोकळ्या जागेतील हवेच्या दबावामुळे सक्शन लाईन ने पाणी खेचले जाते व त्या मोकळ्या जागेत जमा होते. दरम्यान खाली गेलेला पिस्टन पुन्हा वर ढकलला जातो  व जमा झालेले पाणी वर फेकले जाते .

वीज लागणार नसलेल्या पंपाची संकल्पना 

Dr. Abhijit Date
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ ) माधिल उर्जा अभ्यस प्रणाली येथे गेस्ट लेक्चरर म्हणून आर . एम . आय . टि . विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया येथून आलेल्या डॉ  अभिजित दाते यांनी विद्यार्थ्यांसमोर सौर उर्जेवर आधारित पंप तयार करण्याची संकल्पना मांडली. कमी खर्चात वापरता येईल आणि वीज पुरवठ्याची गरज नसेल असा पंप तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते.  




(From Left) Prof S.V. Ghaisas (Director, School of Energy Studies, SPPU), Mr. Omkar Shinde, Mr. Gole Akshay Chandrakant.

1 comment: