12 June, 2016

जल है तो कल हैं

' एकूण ऋतू किती ? ' असा प्रश्न तुम्हाला विचारलात तर तुम्ही म्हणाल 'सोप्पंय !  तीन ऋतू आहेत , हिवाळा,  उन्हाळा आणि पावसाळा…… '  हे झाले पुस्तकी उत्तर, पण गेल्या चार ते पाच वर्षात झालेल्या वातावरणातील बदल पहिला तर आपल्या लक्षात येईल कि हे  ऋतूचक्रही बदलत चालले आहे.
                     
 पूर्वी ७ जून ला महाराष्ट्रात  होणारा मान्सून आता दीड ते दोन महिने उशिराने दाखल होत आहे. महिन्याभरात पडणे अपेक्षित असलेला पाऊस एक दोन दिवसात धोधो बरसून सारे काही वाहून घेऊन जात आहे. निसर्गाचा सातत्याने होत चाललेला ऱ्हास, आर्थिक लोभापोटी केली गेलेली अमर्याद  वृक्ष तोड, हवेत सोडला जाणारा कार्बन डाय ऑक्साइड हे सारे वातावरणातील बदलांना प्रत्यक्ष कारणीभूत आहेत.
                        या सगळ्यांचा परिणाम भोगावा लागतोय तो सामान्य माणसाला. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारतातील शेती व्यवसाय हा मुख्यत्वे पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न हे देखील या पावसाच्या लहरीमुळे प्रभावित झाल्याची असंख्य उदाहरणे पहावयास मिळतात.
                         केवळ शेतीच नाही तर पाण्याच्या या दुर्भिक्षामुळे सामानांचे जीवनही विस्कळीत झाले आहे. जनावरांसाठी हि चारा छावण्या उभारण्याची  शासनावर वेळ आली आहे. या वर काही तरी उपाय करणे आवश्यक आहे. निसर्गचक्र पुनः सन्तुलीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पण ते अतिशय तोडके आहेत. त्यामुळे आपल्याला पाण्याचा योग्य सुनियोजित वापर करण्यासाठी योग्य ती योजना करणे आवश्यक आहे.
सगळ्या समस्यांचे खापर राज्यकर्त्यांवर फोडून हातावर हात धरून बसण्यात काहीच लाभ होणार नाही. आपण सारे एकत्र येउन जर काम केले तर या संकटावर आपण नक्कीच मार्ग काढू शकतो .
                     

                          पुणे, तसे पाहायला गेले तर पाण्याची कमतरता जिथे कधीच भासत नाही असे शहर, पण पुणे जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत कि जिथे पिण्याच्या पाण्याची आजही भ्रांत आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील भट्टी गावापासून केवळ ८ किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे गाव, ' गेळगाणी   '. पहिल्यापासून पाण्याचे दुर्भिक्ष. या गावाला बाकीच्या विश्वाशी जोडणारा पक्का रस्ताही अस्तित्वात नाही.  पुण्यातील 'ज्ञान प्रबोधिनी' संस्थेने गावातील या समस्येवर आपल्या पद्धतीने उपाय करण्याचे ठरविले. येथील भूगोलाचा, भूमिगत जलस्त्रोतांचा तज्ञांच्या मदतीने अभ्यास केला आणि येथे जलसंचयासाठी  एक विहीर बांधण्याचे ठरविले. त्या गावातील स्थानिकांना मदतीला घेऊन असंख्य कार्यकर्त्यांच्या श्रमदानाने प्रबोधिनीने या गावात साधारण ३० फुट व्यास आणि ३० फुट खोल आकाराची या जलसंचयीनी विहीरीचे काम पूर्णत्वास नेले. या परिसरातील एकमेव भूमिगत जलस्त्रोतही  या विहिरीशी सलग्न करण्यात आला आहे. अंदाजे १७ लाख लिटर पाणी धारण करण्याची क्षमता असणारी हि विहीर आता जल संचय करण्यास सिद्ध आहे. याच कार्याची माहिती देणारा हा एक छोटासा माहितीपट.
                            समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत कि जी आपल्याला परिस्थितीची जाणीव करूण देतात. समाज्यातील अनेक समस्या दुर करण्यासाठी एकत्र येउन काम करण्यास आपणास उद्युक्त करतात. अश्या या संघटना आणि त्यांची अशी काही कार्य आपल्या समोर यावीत म्हणून हा छोटासा प्रयत्न…

                                                                                                      आपलाच
                                                                                               गोले अक्षय चंद्रकांत
                                                                                   GOLE AKSHAY CHANDRAKANT

No comments:

Post a Comment