14 July, 2016

केशवसुत स्मृती करंडक काव्यवाचन स्पर्धेत हरिभाई देसाई महाविद्यालयाचा संघ विजेता


GOLE AKSHAY CHANDRAKANT (AKSHAY GOLE)


सरस्वती मंदिर रात्र महाविद्यालयाच्या वतीने कवी केशवसुत  स्मृतिशताब्दी निमित्ताने आंतर महाविद्यालयीन केशवसुत स्मृतीकरंडक स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सांघिक विभागात हरिभाई देसाई महाविद्यालयाने प्रथम, तर फर्ग्युसन महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. 

वैयक्तिक विभागात (कै.) रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा विद्यार्थी अजय गोखले प्रथम आला. हरिभाई देसाई महाविद्यालयाचे अक्षय चंद्रकांत गोले  व यशोदीप मर्ढेकर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या हस्ते झाले. परीक्षक म्हणून डॉ आशुतोष जावडेकर व प्रा. वंदना बोकील यांनी काम पाहिले. 

GOLE AKSHAY CHANDRAKANT (AKSHAY GOLE)

No comments:

Post a Comment