01 January, 2014

आपण सारेच....

प्रत्येक व्यक्तीला आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे नेहमीच वाटत असते आणि प्रत्येक जण ते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. हे नैसर्गिक आहे. त्यात वाईट असे काहीच नाही कारण 'मी' कोणीतरी वेगळा आहे हे सिद्ध करण्या करिता तो स्वतःचे कर्तुत्व वृद्धींगत करण्यासाठी सदैव प्रयात्नावत असतो आणि त्यातूनच व्यक्तीमत्त्वाच्या विकासही होत जातो,  वैयक्तिक आणि सामाजिक अभिवृद्धीतही भर पडत जाते. पण हे सारे कर्तुत्ववान आणि स्वाभिमानी लोकांसाठी....
         ज्यांचे कर्तृत्वच शून्य आहे त्यांचे काय? त्यांनी स्वतःचे वेगळे पण कसे दाखवायचे? मग आम्ही एक पळवाट शोधतो आम्ही सामोच्या व्यक्तीला पाहून काही मानव निर्मित  विशेषणे तयार करतो, आणि त्याला आणि आपल्याला पर्यायाने सगळ्यांनाच एका मानवनिर्मित गटात, कप्प्यात, खंदकात किंवा दुकानात बसवतो. 

        उदाहरणार्थ:
               समोरचा व्यक्ती जरी याच पृथ्वीवरचा असला तरी त्याचा देश कोणता ?

                                             जर आपलाच तर मग--

                त्याचा धर्म कोणता?

                                             जर आपलाच तर मग--

              त्याची जात कोणती?

                                              आपलीच असेल तर मग--

             त्याचे कुळ (घराणे) कोणते?

अश्या एक न धड हजार प्रश्नांची शृंखलाच उभी करून आपण अनाहूतपणे त्या व्यक्तीला आपण आपल्या पासून वेगळे करून ठेवतो आणि पर्यायाने दुरावून बसतो.
माणसामाणसातील  मित्रात्वास ह्या कृत्रिम बेड्या का असाव्यात? 
आपण कर्तुत्व शून्य आहोत का? मग आपणास स्व-परीचयाच्या  ह्या कृत्रिम साधनांच्या कुबड्यांची खरच गरज आहे का?


कि आपणास कावीळच झाली आहे? इतिहासच बोध घेऊन पुढे जायचे कि ते जळलेले मुदडे उकरून काढायचे? हे आपण सुज्ञानेच ठरवावे.

कळशी स्पर्धा करणाऱ्या या प्रगतीशील जगात आपण काळाच्या बरोबरीने चाललो नाही तर नाश निश्चित आहे. आणि एकत्र चाललो तर विजय निश्चित आहे;
बाकी सुज्ञा बोलणे न लागे!!!!!!!

No comments:

Post a Comment