02 June, 2014

तेलंगाना!- भारताचे २९ वे राज्य


१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. परंतु तत्कालीन भारतात असंख्य संस्थाने  होती. त्या पैकी काही संस्थाने राजी खुशीने भारतात विलीन झाली, मात्र काही संथानिकांनी आपला हेका सोडला नाहीस्वतःचे टिच भर संस्थान म्हणजे जणू एक सार्वभौम राष्ट्रच आहे अश्या अविर्भावात ते होते. त्या पैकी एक म्हणजे हैदराबादचा निजाम.
वास्तविक हैद्राबाद संस्थांच्या चारीही दिशांना भरतच होता तरीही निजामाने  भारतात विलीन न होण्याचा निर्णय घेतला. हैद्राबाद संथानात निजामाची रझाकार नावाचे सैन्य धुमाकूळ घालत होते. भारताच्या मध्य भागात असलेले हे निजाम राज्यामुळे नाविन्याने उदयास आलेल्या भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थान आणि पर्यायाने निजाम यांच्या विरुद्ध पोलिस कार्यवाही केली याचे नाव होते Operation Polo. या कार्यवाही अंतर्गत १६ सप्टेंबर१९४८ रोजी भारतीय सैन्य पाच आघाड्यांवरून  हैद्राबाद संस्थानात  शिरले. अवघ्या चारच दिवसात निजामाच्या फौजेने भारतीय लश्करासमोर गुडघे टेकले. आणि हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.
इसवी सन १९५६ साली हैद्राबाद संस्थानाचे काही भाग करण्यात आले. त्या पैकी तेलंगाना नामक भाग हा आंध्र राज्याला जोडण्यात आला आणि आंध्रप्रदेश या राज्याची निर्मिती झाली. जानेवारी १९६९ च्या सुमारास उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी 'जय तेलंगाना चळवळ' सुरु केली. १९९७ साली भारतीय जनता पक्षाच्या राज्य प्रभागाने वेगळ्या तेलंगणाची मागणी असलेला प्रस्ताव मंजूर केला.  २००० साली तेलंगाना भागातील, स्वतंत्र तेलंगाना समर्थक, काँग्रेस आमदारांनी तेलंगाना काँग्रेस विधायक मंचाची स्थापना केली. एव्हढेच नव्हे तर कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी देखील स्वतंत्र तेलंगानाला समर्थन द्यावे अशी मागणीही त्या वेळी करण्यात आली.
याच कालावधीत सुमारे एप्रिल २००१ साली के सी राव (KCR) यांनी 'तेलंगाना राष्ट्र समिती' (TRS) या नवीन पक्षाची स्थापना केली.  या पक्षाची स्थापना केवळ एकाच मुद्द्यासाठी झाली. तो म्हणजे स्वतंत्र तेलंगाना, आणि तो ही राजधानी हैद्राबाद समवेत. राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाने हे बिल संसदेमध्ये आणावे या साठी  २९ नोव्हेंबर २००९ साली के सी राव यांनी   आमरण उपोषण सुरु केले. ९ डिसेंबर २००९ साली भारताचे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी घोषणा केली कि भारत सरकार द्वारे स्वतंत्र तेलंगानाच्या निर्मितीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.
अर्थातच या घोषणेचा परिणाम दिसू लागला. आंध्र आणि रायलसीमा भागात स्वतंत्र तेलंगणाच्या विरुद्ध वातावरण तयार होऊ लागले.  स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीच्या विरोधात अनेक आंदोलने उभी राहिली. स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीच्या विरोधातील आंदोलनाची उग्रता इतकी वाढली कि अवघ्या काही दिवसातच म्हणजे २३ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व पक्षांचे एकमत झाल्या शिवाय स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीच्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात येणार नसल्याची घोषणा केंद्र सरकारला करावी लागली. दिल्लीतील काँग्रेस वर्किंग कमिटी ने, २३ जुलैला, एका निश्चित कालावधीच्या आतमध्ये स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीचा प्रस्ताव एकमताने मान्य केला. सीमांध्र भागातील खासदारांच्या विरोधकांकडून होणाऱ्या विरोधाला न जुमानता १३ फेब्रुवारीला स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीचा प्रस्ताव तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी लोकसभेच्या पटलावर मांडला. मात्र लोकसभेच्या पटलावर हे बिल सदर करताना एक वेगळाच प्रकार घडला.  सीमांध्र विभागातील एक खासदार ल राजगोपाल यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीला असलेला आपला  विरोध पेपर स्प्रे चा वापर करुन जाहीर केला. त्यामुळे हे बिल सदर करत असतानाच ते थांबवून  संसदेतील लोकांना  भवन सोडावे लागले. या पेपर स्प्रे मुले तर काही खासदारांना दवाखान्यात दाखल करावे लागले.
भारतीय जनता पक्षाच्या मदतीने १८ फेब्रुवारी २०१४ रोजी  स्वतंत्र तेलंगाना निर्मितीचे हे बहुचर्चित बिल लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्या नंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजे २० फेब्रुवारी २०१४ रोजी भारतीय जनता पक्षाच्या मदतीने हे बिल राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. ४ मार्च २०१४ रोजी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीचा दिवस ठरला. तो दिवस म्हणजे २ जून २०१४.
१ मार्च २०१४ पासून चालू असलेली राष्ट्रपती राजवट संपून २ जून २०१४ रोजी तेलंगाना या भारतातील २९ व्या राज्याची निर्मिती झाली.  स्वतंत्र  तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तेलंगाना राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हैद्राबाद पुढील दहा वर्षे तेलंगाना आणि सीमांध्र या दोन्ही राज्यांची राजधानी असेल. विभाजनानंतर आंध्रप्रदेशचे (सिमंध्रचे) मुख्यमंत्री म्हणून तेल्गुदेसम पक्षाचे चंद्राबाबू नाईडू हे ८ जून २०१४ रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
तेलंगाना!-  भारताचे २९ वे राज्य

तेलंगाना!-  भारताचे २९ वे राज्य

 

No comments:

Post a Comment