06 August, 2014

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही!!!!!!

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही. आजूबाजूला तश्या  बऱ्याच घटना घडत आहेत.  डोक्यातील  विचारांचे विचारांचे वादळ एव्हड्यात शांत होईल असेही वाटत नाही तरीही लिहिले नाही. पण त्याचा अर्थ  माझ्या शब्दांची धार कमी झाली असा  मुळीच होत नाही, तर त्या शब्द रुपी अस्त्राला भवानी खड्गा सारखे दुधारी करण्याचा मानस आहे, आणि कदाचित  म्हणूनच काही विशेष लिहिले नाही..... 

02 June, 2014

तेलंगाना!- भारताचे २९ वे राज्य


१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. परंतु तत्कालीन भारतात असंख्य संस्थाने  होती. त्या पैकी काही संस्थाने राजी खुशीने भारतात विलीन झाली, मात्र काही संथानिकांनी आपला हेका सोडला नाहीस्वतःचे टिच भर संस्थान म्हणजे जणू एक सार्वभौम राष्ट्रच आहे अश्या अविर्भावात ते होते. त्या पैकी एक म्हणजे हैदराबादचा निजाम.

28 May, 2014

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे काय माहिती आहे? सावरकर म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर पेटलेले अग्निकुंडच उभे राहते, त्यांच्या लिहिलेल्या रचना स्मरतात आणि त्या रचनेतील प्रत्येक शब्द त्या यज्ञकुंडात पेटलेल्या ज्वाळे सारखे मनात धगधगत राहतात

15 May, 2014

भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास


डोक्यावरती असलेला आकाशाचा उलटा घुमट माणसाच्या मनात अनादी काळापासूनच कुतूहल निर्माण करत आला आहेआकाश म्हणजे नेमके काय? त्याचा विस्तार किती? आकाशातील ग्रह तारे म्हणजे नेमके कोण? आकाशात अजून कोण कोण आहेत? ते आपल्या पासून किती अंतरावर आहेत? आकाशातील ग्रह तारे इत्याद्दींचा आपल्यावर काय प्रभाव पडतो? या आणि या सारख्या असंख्य प्रश्नांनी मनुष्याच्या मस्तिष्कात हलकल्लोळ केला होता. या प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्यामगे जर मनुष्य लागला नसता तरच नवल! आणि म्हणूनच खगोलशास्त्र हे माणसाच्या इतिहासातील अभ्यासल्या गेलेल्या सर्वात जुन्या विज्ञानशाखे पैकी एक आहे.

30 April, 2014

महाराष्ट्र दिन

"आजोबा आजोबा, महाराष्ट्र दिन म्हणजे काय हो?" खांद्यावरचे दप्तर सोफ्यावर फेकत दिनूने आजोबांना प्रश्न केला. हे दिनूचे रोजचेच, शाळेतून आला कि महाराष्ट्र दिनत्याचा प्रश्नांचा भडीमार सुरु व्हायचा. तो काय प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. परवाच तो त्याच्या बाबांना विचारात होता "सुर्यास्त होतो म्हणजे; सुर्य डुबतो म्हणजे; आपण नाही का समुद्रात सूर्याला डुबताना पहिले होते तसे तो बॉल पाण्यात डुबतो तसा डुबतो का?"  या त्याच्या वाक्यावर त्याचे बाबा पोट धरून हसले होते. आजही त्याने आल्या आल्या आजोबांकडे मोर्चा वळवला होता "आजोबा, सांगाना  महाराष्ट्र दिन म्हणजे काय?" "का रे बाळ? तू हा प्रश्न का विचारतोयस?" वर्तमान पत्रातील अर्धवट राहिलेले शब्दकोड्यातील रिकाम्या चौकटी भरत आजोबांनी विचारले. "शाळेतल्या अनघा ताईंनी सांगितलाय कि उद्या महाराष्ट्र दिन आहे म्हणून शाळेला सुट्टीये! पण मग महाराष्ट्र दिन म्हणजे काय?"

19 April, 2014

इतिहास विज्ञानाचा!!!!!


आपण सर्वच भविष्यावर नजर ठेऊन, तो अधिक सुखकर व्हावा म्हणून वर्तमानाशी सर्वतोपरी झुंजत असतो. पण त्यासाठी सर्वात उपयोगी ठरते ती भूतकाळाची धगधगती मशाल. हीच मशाल आपल्याला पूर्वी घडून गेलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यापासून परावृत्त करते. भारतीय इतिहासातील एका महत्वाच्या कालखंडातील काही घटनांचा अभ्यास करण्याच्या हेतूने मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले इटलीच्या एका क्रांतिकारकाचे जीवन चरित्र "जोसेफ मॅझिनी" वाचत होतो. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील सुरवातीचा  भाग हा इतिहासच्या अभ्यासाचे महत्व सांगणारा आहे. मला वाटते कि कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकाची अथवा लेखाची याहून चांगली सुरुवात असूच शकत नाही

11 April, 2014

Renewable energy Source - Wind energy, what are the pros and cons of Wind energy?


Renewable energy Source - Wind energy, what are the pros and cons of Wind energy?

What is wind? 

 Wind can be define as natural movement of the air, especially in the form of a current of air blowing in a particular direction, or in simple words we can say that the wind is nothing but the flow of gases or air.