12 December, 2014

Let Us Globalize Compassion and Set Our Children Free ~ Kailash Satyarthi


My dear children of the world…












Kailash Satyarthi


Born:                                                              11 January 1954, Vidisha, India
Residence at the time of the award:            India
Prize motivation:                                    "for their struggle against the suppression of children and young people and for the right of all children to education"

Let Us Globalize Compassion and Set Our Children Free
(Nobel prize acceptance speech by  Kailash Satyarthi)

दुनिया भरके मेरे प्यारे बच्चो,

(My dear children of the world…)


07 October, 2014

Separation of variable

Separation of variable

Two dimensional Laplace’s equation in Cartesian Co-ordinates.
 Let us consider a wave function ψ . Where ψ = ψ ( x , y )
Then the Laplace’s equation can be written as
s 2 ψ = 0
Or in other words we can write as
( ∂ 2 ψ / ∂ x 2 ) + ( ∂ 2 ψ / ∂ y 2 ) = 0  _ _ _ _ _ _ _  ( 1 )

06 August, 2014

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही!!!!!!

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही. आजूबाजूला तश्या  बऱ्याच घटना घडत आहेत.  डोक्यातील  विचारांचे विचारांचे वादळ एव्हड्यात शांत होईल असेही वाटत नाही तरीही लिहिले नाही. पण त्याचा अर्थ  माझ्या शब्दांची धार कमी झाली असा  मुळीच होत नाही, तर त्या शब्द रुपी अस्त्राला भवानी खड्गा सारखे दुधारी करण्याचा मानस आहे, आणि कदाचित  म्हणूनच काही विशेष लिहिले नाही..... 

02 June, 2014

तेलंगाना!- भारताचे २९ वे राज्य


१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. परंतु तत्कालीन भारतात असंख्य संस्थाने  होती. त्या पैकी काही संस्थाने राजी खुशीने भारतात विलीन झाली, मात्र काही संथानिकांनी आपला हेका सोडला नाहीस्वतःचे टिच भर संस्थान म्हणजे जणू एक सार्वभौम राष्ट्रच आहे अश्या अविर्भावात ते होते. त्या पैकी एक म्हणजे हैदराबादचा निजाम.

28 May, 2014

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे काय माहिती आहे? सावरकर म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर पेटलेले अग्निकुंडच उभे राहते, त्यांच्या लिहिलेल्या रचना स्मरतात आणि त्या रचनेतील प्रत्येक शब्द त्या यज्ञकुंडात पेटलेल्या ज्वाळे सारखे मनात धगधगत राहतात

15 May, 2014

भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास


डोक्यावरती असलेला आकाशाचा उलटा घुमट माणसाच्या मनात अनादी काळापासूनच कुतूहल निर्माण करत आला आहेआकाश म्हणजे नेमके काय? त्याचा विस्तार किती? आकाशातील ग्रह तारे म्हणजे नेमके कोण? आकाशात अजून कोण कोण आहेत? ते आपल्या पासून किती अंतरावर आहेत? आकाशातील ग्रह तारे इत्याद्दींचा आपल्यावर काय प्रभाव पडतो? या आणि या सारख्या असंख्य प्रश्नांनी मनुष्याच्या मस्तिष्कात हलकल्लोळ केला होता. या प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्यामगे जर मनुष्य लागला नसता तरच नवल! आणि म्हणूनच खगोलशास्त्र हे माणसाच्या इतिहासातील अभ्यासल्या गेलेल्या सर्वात जुन्या विज्ञानशाखे पैकी एक आहे.

30 April, 2014

महाराष्ट्र दिन

"आजोबा आजोबा, महाराष्ट्र दिन म्हणजे काय हो?" खांद्यावरचे दप्तर सोफ्यावर फेकत दिनूने आजोबांना प्रश्न केला. हे दिनूचे रोजचेच, शाळेतून आला कि महाराष्ट्र दिनत्याचा प्रश्नांचा भडीमार सुरु व्हायचा. तो काय प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. परवाच तो त्याच्या बाबांना विचारात होता "सुर्यास्त होतो म्हणजे; सुर्य डुबतो म्हणजे; आपण नाही का समुद्रात सूर्याला डुबताना पहिले होते तसे तो बॉल पाण्यात डुबतो तसा डुबतो का?"  या त्याच्या वाक्यावर त्याचे बाबा पोट धरून हसले होते. आजही त्याने आल्या आल्या आजोबांकडे मोर्चा वळवला होता "आजोबा, सांगाना  महाराष्ट्र दिन म्हणजे काय?" "का रे बाळ? तू हा प्रश्न का विचारतोयस?" वर्तमान पत्रातील अर्धवट राहिलेले शब्दकोड्यातील रिकाम्या चौकटी भरत आजोबांनी विचारले. "शाळेतल्या अनघा ताईंनी सांगितलाय कि उद्या महाराष्ट्र दिन आहे म्हणून शाळेला सुट्टीये! पण मग महाराष्ट्र दिन म्हणजे काय?"

19 April, 2014

इतिहास विज्ञानाचा!!!!!


आपण सर्वच भविष्यावर नजर ठेऊन, तो अधिक सुखकर व्हावा म्हणून वर्तमानाशी सर्वतोपरी झुंजत असतो. पण त्यासाठी सर्वात उपयोगी ठरते ती भूतकाळाची धगधगती मशाल. हीच मशाल आपल्याला पूर्वी घडून गेलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यापासून परावृत्त करते. भारतीय इतिहासातील एका महत्वाच्या कालखंडातील काही घटनांचा अभ्यास करण्याच्या हेतूने मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले इटलीच्या एका क्रांतिकारकाचे जीवन चरित्र "जोसेफ मॅझिनी" वाचत होतो. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील सुरवातीचा  भाग हा इतिहासच्या अभ्यासाचे महत्व सांगणारा आहे. मला वाटते कि कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकाची अथवा लेखाची याहून चांगली सुरुवात असूच शकत नाही

11 April, 2014

Renewable energy Source - Wind energy, what are the pros and cons of Wind energy?


Renewable energy Source - Wind energy, what are the pros and cons of Wind energy?

What is wind? 

 Wind can be define as natural movement of the air, especially in the form of a current of air blowing in a particular direction, or in simple words we can say that the wind is nothing but the flow of gases or air.

10 April, 2014

ज़रा सोचिये!!!!




अपने मातृभूमि का त्याग करने कि इच्छा केवल दो प्रकार के व्यक्तिओंके ही मन मैं उत्पन्न हो सकती है. एक जिसके ह्रदय मैं केवल स्वार्थ भरा हो या फिर दूसरा जो अपने ही देश मैं स्वयं का स्थान प्रस्थापित करने मैं या फिर स्वयम अपना पुरुषार्थ सिध्द करने मैं असफल रहा हो. आशा करता हूँ के हम सब का मन इन विकारों से मुक्त रहे!!!!!

05 April, 2014

‘काय रे बाळ इथे कशाला आलास?’


 

अगदी फार जुनी नाही तर साधारण १४० वर्षांपूर्वीची हि कथा आहे.  इंग्रजी ध्वजाच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतातील काही निवडक स्वतंत्र संस्थानांपैकी एका संस्थानातील हि गोष्ट. पुत्रहीन राजाच्या मृत्यूनंतर राजाचा वारस कोण? या विवंचनेत असणाऱ्या विधवा राणी साहेबांनी तत्कालीन हिंदू राज्य पद्धती नुसार एक मुल दत्तक घेण्याचा निश्चय केला. तत्कालीन  समाजमान्य पद्धत होती, कि योग्य, चुणचुणीत,  हुशार आणि मुख्य म्हणजे घराण्याशी पदर जुळणारा असे एक मुल दत्तक घ्यायचे आणि त्याला राज्यकारभाराचे प्रशिक्षण देऊन भविष्यकाळामध्ये राजा होण्यासाठी मोठा करायचे. फर्मान सुटले, सर्वत्र दवंडी पिटली गेली.
राजधानी पासून सुमारे ६०० किलोमीटर दूर नाशिक जवळच्या कवळाणे गावात या राजघराण्याची एक शाखा होती. दोनवेळच्या खाण्याची भ्रांत, अतिशय हलकीच्या परिस्थितीत हे कुटुंब आपले जीवन व्यतीत करत होते. घरात वडील आणि तीन मुले. थोरल्यामुलाचे नाव आनंदराव, मधल्यामुलाचे नाव गोपाळराव तर धाकट्याचे नाव संपतराव. एके दिवशी अचानक कलेक्टरची माणसे घरी आली. राजदरबारी उपस्थित राहण्याचा निरोप त्यांना देण्यात आला. ठेवणीतले वस्त्रे घालून ते आपल्या तीन लहान मुलांसमेत त्या कलेक्टर च्या माणसांबरोबर निघाले. प्रथम ते नाशिकला आले तिथून कलेक्टर त्यांना घेऊन गेले ते थेट राजधानीतच. रुंद रस्ते, मोठी घरे, भव्य महाल, डोळे दिपवून टाकणारे हे दृश्य त्या लहान मुलांनी कधीच पहिले नव्हते. श्रीमंतीचे ओसंडून वाहणारा सभोवताल पाहत, चेहेऱ्यावर भांबावलेल्या मुद्रा घेऊन  ते थेट राजाच्या राजदरबारात गेले. दरबारात इतरही ठिकाणांहून बरीच मुले त्यांच्या पालकांसमवेत आलेली होती. मुख्य व्यासपीठावर राजाचा सिंहासन सोडून पाच जण बसले होते, सेनापती, कारभारी, दिवाणजी, प्रधानजी आणि मुनीम. मुलांची निवड करणे हेच त्या मंडळाचे मुख्य काम होते.  आलेल्या मुलांच्या मुलाखती  चालू होत्या,  मुलांना अनेक प्रश्न विचारले जात होते. पण साधारणतः कायरे बाळ कोठून आलास? तुझे जेवण झाले का? असे काही सोपे प्रश्न विचारात होते विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न मात्र सगळ्याच मुलांना विचारण्यात आला “काय रे बाळ इथे कशाला आलास?” मात्र काही आई वडील जे आपापल्या मुलांना घेऊन आले होते त्यांनी या प्रश्नाचा आधीच अंदाज बांधला होता  आणि त्यांनी मुलांना सांगून ठेवले होते किंवा त्या मुलाच्या वयाला साजेसे तो उत्तर देत  असे कि जर मी तुम्हाला आवडलो तर मला खूप दूध मिळणार आहे, तर एखादा म्हणायचा कि मला लाडू खूप आवडतात आणि तुम्हाला जर मी आवडलो  तर मला लाडूच्या डोंगरावर बसायला मिळेल. या  कावळाणे गावातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना देखील हाच प्रश्न विचारला. धाकट्या मुलाला विचारले 'काय रे बाळ इथे कशाला आला?' तो पाळूनच गेला. थोरल्या मुलाला विचारले 'काय रे बाळ इथे कशाला आला? तो खांदे उडवून म्हणाला "कोण जणू?" (काय माहित). पण मधल्या मुलाला गोपाळला जेव्हा विचारण्यात आले कि "काय रे बाळ इथे कशाला आलास?" एक पाय पुढे ठेऊन आणि एक हात छातीवर ठेऊन प्रश्नकर्त्याच्या नजरेत नजर घालून तो म्हणाला कि "राजा व्हायला आलोय". प्रश्नकर्त्यांनी दुसऱ्या कोणाचीही निवड न करता याच मुलाची निवड केली त्या मुलाला आपण ओळखतो ते महाराज सयाजीराजे गायकवाड या नावाने.



या "काय रे बाळ इथे कशाला आलास? या प्रश्नाला खूप छटा आहेत, खूप अर्थ आहे. जीवन आम्हाला प्रत्येक पावलावर विचारात असते कि "काय रे बाळ इथे कशाला आलास?" इथे कशाला आलास म्हणजे विज्ञान शाखेत कशाला आलास, वाणिज्य शाखेत का आलास? कला शाखेत का आलास? "काय रे बाळ इथे कशाला आलास? म्हणजे या कॉलेजला कशाला आलास हे आहे. पण या प्रश्नांची रेष ही जन्माला कशाला आलास इथपर्यंत ही जाते. आणि आम्ही हा प्रश्न ऐकल्या वर कमालीचे गोंधळून जातो बऱ्याच वेळेला हा प्रश्न ऐकल्यावर आम्ही परिस्थितीला घाबरून पळून जातो किंवा अजाण बालकापरी आम्ही म्हणतो कि मला दूध हवाय म्हणून, मला लाडू हवाय म्हणून  किंवा फार तर खांदे उडवून उत्तर देतो कोण जणू? जीवनाच्या नजरेला नजर भिडवून बेरडपणे उत्तर द्यायला हवे कि राजा व्हायला  आलोय.

27 March, 2014

Gravitational Force (गुरुत्वाकर्षण)


विज्ञान जर मातृभाषेतून शिकवले गेले तर विद्यार्थी ते अधिक प्रभावीपणे आत्मसात करू शकतात, असे काही भाषा तज्ञ म्हणतात. मलाही काही अंशी ते पटते. पर्यन्तु त्यासाठी संपूर्ण विज्ञान हे मराठीत शब्दशः भाषांतरित करणे आणि काही इंग्रजी तांत्रिक शब्दांचे भाषांतर करण्याच्या हट्टापायी अधिक क्लिष्ट मराठी पर्यायी शब्द योजने हे अव्यवहारिक ठरेल. उदाहरणार्थ मी बल, गती, त्वरण, गतीय उर्जा या शब्दांऐवजी आपल्याला  अनुक्रमे(respectively) force, velocity, acceleration, kinetic energy हे शब्द जास्त लवकर समजतील त्यामुळेच विज्ञान समजून सांगताना त्यातील तांत्रिक शब्द इंग्रजीमध्ये आणि इतर  विवरण मराठीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. जेणे करून इंग्रजी शब्दांशी परिचय होईल आणि त्यांचे मराठीतून यथायोग्य स्पष्टीकरणही देता येईल. विज्ञान जास्तीत जास्त सोप्या भाषेत सांगण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीत आहे.
आपण Physics (भौतिक शास्त्र) च्या संदर्भात काही मजेदार गोष्टी जाणून घेऊया. Physics हा मुळ ग्रीक भाषेतील शब्द आहे. ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो ‘Knowledge of Nature’. Physicsची व्याख्या आपण अशीही करू शकतो ‘the study of matter, energy, and the interaction between them’ अर्थात energy आणि matter यांचा अभ्यास करणारी विज्ञानची एक शाखा.
Gravitational Force (गुरुत्वाकर्षण):
 वस्तुमान (mass) असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण (Gravitation) असे म्हणतात ई.स. १६८७  च्या सुमारास इंग्रज शात्रज्ञ Sir Issc Newtonयांनी gravitation forceचा शोध लावला. (शोध लावला याचा अर्थ gravitational force हा Issc Newtonच्या आधी अस्तित्वातच नव्हता का? मुळीच नाही, gravitational force हा विश्वाच्या उत्पत्ती पासूनच अस्तित्वात आहे. मग Issc Newtonने त्याचा शोध लावला म्हणजे काय केले? तर Issc Newtonने gravitational force हा सूत्रबद्ध केला.) यालाच Newton’s Law of Universal Gravitation असे म्हणतात. Mathematically
Gravitational force =
F = G M1M2/   r2
येथे
G = Gravitational Constant
M1 आणि M2 = mass of both bodies
  R = दोन्ही वस्तूंमधील अंतर
Mass आणि Weight   या दोन्ही संज्ञा वेगळ्या वेगळ्या आहेत. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणा (Gravitational force)मुळे  मिळणारे त्वरण (Acceleration)  आणि वस्तुमान (Mass) यांच्या गुणाकाराएवढे बल (Force)
Mathematically
Weight =m/g
येथे
m = Mass
g = Gravitational Acceleration [पृथ्वीच्या पृष्ठभागावर (on the surface of the earth) g = 9.8 m/s2] म्हणजेच पृथ्वीच्या gravitational forceमुळे असलेले acceleration.
समजा तुमचे पृथ्वी वरील वजन ६० किलो ग्रॅम आहे. तर सुर्य मालेतील इतर ग्रहांवरील तुमचे वजन काय असेल?
१) बुध     (Mercrury)   :      २२.८ किलो ग्रॅम
२) शुक्र     (Venus)     :      ५४.६ किलो ग्रॅम
३) पृथ्वी    (Earth)      :      ६० किलो ग्रॅम
४) मंगळ    (Mars)      :      २२.८ किलो ग्रॅम
५) गुरु      (Jupiter)     :      १५२.४ किलो ग्रॅम
६) शनी     (Saturn)     :      ५५.८ किलो ग्रॅम
७) युरेनस    (Uranus)    :      ४८.० किलो ग्रॅम
८) नेप्चून    (Neptune)   :      ७२.० किलो ग्रॅम




आपणास माहित आहे काय?
१)      Gravity मुळेच आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी आणि इतर ग्रह सुर्याभोवती अंडाकार कक्षेत (in elliptical orbits) फिरत आहेत.
२)      पृथ्वीच्या विषुववृत्तावर (equator) आणि ध्रुवांवर (poles of the Earth) ‘g’ची value वेगळी आहे.
३)      समुद्रात येणारी भारती आहोटी हि चंद्राच्या gravitational force मुळे होते.
४)      Escape velocity: कोणत्याही rocket पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाण्यासाठी gravitational force चा सामना करावा लागतो. rocket एका विशिष्ट गती पेक्षा जास्त गतीने जर उडाले तरच ते gravitational force वर मत करू शकते त्या गतीला म्हणतात Escape velocity.

सुर्य मालेतील ग्रहांची Escape velocity
a) बुध       (Mercrury)   :      ४.३    किलो मीटर प्रती सेकंद
b) शुक्र       (Venus)     :      १०.३   किलो मीटर प्रती सेकंद
c) पृथ्वी      (Earth)      :      ११.२  किलो मीटर प्रती सेकंद
d) मंगळ     (Mars)       :      ५.०    किलो मीटर प्रती सेकंद
e) गुरु       (Jupiter)      :      ५९.६   किलो मीटर प्रती सेकंद
f) शनी       (Saturn)      :      ३५.६   किलो मीटर प्रती सेकंद
g) युरेनस     (Uranus)     :      २१.३   किलो मीटर प्रती सेकंद
h) नेप्चून     (Neptune)    :      २३.८   किलो मीटर प्रती सेकंद
) सर्वात जास्त gravitational force कोठे आहे माहित आहे?
कृष्ण विवर (Black Hole) हे अवकाशातील असे ठिकाण आहे जिथे gravitational force खूप जास्त आहे. Black Holeची escape velocity एव्हढी जास्त आहे कि त्या मधून प्रकाशही बाहेर येऊ शकत नाही. सुर्यापेक्षा कितीतरीपटीने मोठ्या ताऱ्याच्या जीवनातील हि एक अंतिम स्थिती आहेभारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांच्या सिद्धान्तानुसार सूर्याच्या तिपटीहून  जास्त वस्तुमान असलेल्या तार्यांचे कृष्णविवरात रुपांतर होते